शब्दात मी.
हरवण्याचा अन् गवसण्याचा, प्रवास हा अंतरीचा...पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक
नीरज चोप्राचं ऑलिम्पिकमधील रौप्यपदक, अर्शद नदीमच्या ऐतिहासिक कामगिरीसमोर थोडंसं झाकोळलं गेलं हे खरं, पण...
...चौकट
माणूस स्वतःसाठी एक अदृश्य अशी मानसिक, वैचारिक, नैतिक आणि सामाजिक चौकट तयार करतो, स्वतःची ओळख, अस्तित्व जपता यावं म्हणून.
...चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)
विचार करायला लावणारा; अगदी वेगळ्या पठडीतला; मेंदूला थोडासा त्रास देऊन, एकाग्रतेने, विचार करता करता, एकदा तरी पाहावा असा चित्रपट!
...पुस्तक परिचय: The Art of Living: भाग ३ -- कुटुंब
कौटुंबिक जीवन प्रेमाचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देतं, आणि त्यामुळेच कितीही तक्रारी असल्या तरी, कुटुंबात परत जाण्यात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो. पण फक्त एवढंच एक कारण नसतं, आपल्याला कुटुंबाबद्दल विश्वास वाटायला; कुटुंब खरं तर अशी एक जागा असते, जिथे आपल्याला, आपली खरी ओळख जगता येते.
कुटुंब खरंच एवढं महत्वाचं असतं? कुटुंबाच्या बाहेर आपण आपली खरी ओळख जगू शकत नाही? याचं उत्तर नाही असंच आहे. आयुष्यात आपण फक्त आपल्याला दिली गेलेली भूमिका जगतो. आपलं मूळ स्वत्व, आपली खरी ओळख जगण्याचा आपल्याला अधिकारच उरत नाही.
...पुस्तक परिचय: The Art of Living: भाग २ -- लग्न
Balzac च्या पुस्तकातील पात्र एक चांगला विचार व्यक्त करतं, "लग्न आयुष्याला दिशा देते, तर प्रेम फक्त आभासी आनंद. लग्न टिकून राहतं, सुरुवातीचं आकर्षण संपलं तरीही, आणि आयुष्यातील मौल्यवान गोष्टीही जपून ठेवतं. म्हणूनच, आनंदी वैवाहिक आयुष्य अशा मैत्रीच्या पायावर उभारलं जाऊ शकतं, जिच्या प्रकाशात, दोघांच्याही उणीवा आपसूकच झाकोळल्या जातात."
...पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम
लेखकाने हे पुस्तक निबंध संग्रह स्वरूपात लिहिताना जगण्याच्या कलेचा विविध बाजूंनी विचार केला आहे.. प्रेम, लग्न, कौटुंबिक जीवन, मैत्री, विचार, काम, नेतृत्व, म्हातारपण, आनंद. गंमतीशीरही वाटेल आणि विचारही करायला लावेल अशी गोष्ट म्हणजे, लेखकाने आनंद पुस्तकाच्या सर्वात शेवटी नेऊन ठेवला आहे, आणि प्रेम अगदी सुरुवातीला.
...पुस्तक परिचय: मनात: भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण
६ जानेवारी १९०० रोजी व्हिएन्नामध्ये एका पुस्तकाचं परीक्षण छापून आलं. या पुस्तकानं माणूस स्वतःकडे कसा पाहतो, याची दृष्टीच बदलून जाणार होती. त्याआधी या पुस्तकाविषयी कोणी ऐकलंच नव्हतं. या युगप्रवर्तक पुस्तकाचं नाव होतं "The interpretation of dreams" आणि याचा लेखक होता ४४ वर्षांचा, फ्रायबर्ग, ऑस्ट्रिया इथला एक ज्यू डॉक्टर -- सिग्मंड फ्रॉईड.
...पुस्तक परिचय: मनात: भाग १ -- भारतीय विचार
अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा. मात्र आवड ते निवड हा कठीण रस्ता फक्त काहींनाच पार करता येतो. एक चांगलं उदाहरण म्हणजे लेखक अच्युत गोडबोले.
...